Posts

Showing posts from September, 2017
Image
हा चंद्र तुझ्यासाठी  ही रात तुझ्यासाठी, आरास ही ताऱ्यांची.... गगनात तुझ्यासाठी, कैपाक अशावेळी, मज याद तुझी आली...... ये नाSSSSS..... मोहरत्या स्वप्नांना घेऊन ये तू, थरथरत्या स्पर्शांना घेऊन ये तू, अनुरागी रसरंगी होऊन ये तू, नाजुकशी एक परी होऊन ये तू !!! वर्षाव तुझ्या तारुण्याचा, रिमझिमता माझ्यावरी होऊ दे..... रेशीम तुझ्या लावण्याचे, चंदेरी माझ्यावरी लहरू दे...... नाव तुझे माझ्या ओठावर येते, फूल जसे कि फूलताना दरवळते..... इतके मज कळते, अधुरामी येते, चांदरात ही बघ नीसटून जाते.... बांधिन गगनास झुला, जर देशील साथ मला..... ये नाSSSSS..... मोहरत्या स्वप्नांना घेऊन ये तू, थरथरत्या स्पर्शांना घेऊन ये तू, अनुरागी रसरंगी होऊन ये तू, नाजुकशी एक परी होऊन ये तू !!! हे क्षण हळवे एकांताचे, दाटलेले माझ्या किती भवताली..... चाहूल तुझी घेण्यासाठी, रात्र झाली आहे मऊ मखमाली..... आज तुला सारे काही सांगावे, बिलगुनिया तू मजला ते ऐकावे ... होऊन कारंजे. उसळे मन माझे, पाऊल का अजुनी ना तुझे वाजे..... जीव माझा व्याकुळला, दे आता हाक मला..... ये नाSSSSS..... मोहरत्य...